सर्व महिलांना ST प्रवासात 50 % सरसकट सूट
- 1
- सर्व महिलांना ST प्रवासात 50 % सरसकट सूट उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा – MSRTC Free Travel Scheme
- MSRTC Free Travel Scheme
- MSRTC Free Travel Scheme : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अतिशय मोठी व आनंदाची घोषणा महाबजेट 2023 अर्थसंकल्पात केली आहे. अतिशय मोठा निर्णय महिलांसाठी या अर्थसंकल्पात घेतला आहे. तो काय आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोणता निर्णय घेतला याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहून घेऊया.
- शिंदे फडणवीस सरकारकडून महाबजेट 2023 अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक प्रकारचे चांगले निर्णय घेतलेले आहेत व ते निर्णय अर्थसंकल्पात जाहीर देखील केलेले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा व आनंदाचा निर्णय म्हणजे आता सर्व महिलांना ST प्रवासात सरसकट पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे. अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.
- महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ च्या बस तिकीट प्रवासामध्ये सरसकट पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू कस्तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापन करण्यात येईल यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल असे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले आहे. MSRTC Free Travel Scheme

Post a Comment