पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट| (Maharashtra Weather update) दि. ७ मार्च २०२३
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट
चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा*🌧️⛈️🌪️
पुणे : सूर्य तळपू लागल्याने तापमान चाळिशीपार गेले आहे. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे. यातच आजपासून (ता. ७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र,
मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा, विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १५ ते २७ अंशांच्या दरम्यान होता.
उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
🌡गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३६.८ (१७.५), जळगाव ३८.५ (२०), धुळे ३८ (१७), कोल्हापूर ३६.७ (२२.७), महाबळेश्वर ३१.५ (१८.१), नाशिक ३५.२ (१९.३), निफाड ३५.५ (१५.१), सांगली ३७.६ (२३.५), सातारा ३६.२ (२१.३), सोलापूर ४०.३ (२५.१), सांताक्रूझ ३२ (२२.८), डहाणू ३२.६ (२२.६), रत्नागिरी ३२.३ (२२.५), छत्रपती संभाजीनगर ३७.२ (२०.४), नांदेड ३८ (२४.२), परभणी ३९.१ (२४.१), अकोला ४०.४ (२२.८), अमरावती ३८.८ (२३), बुलडाणा ३८ (२४), ब्रह्मपुरी ४०.२ (२४.४), चंद्रपूर ४०.२ (२५.४), गडचिरोली ३५.८ (२०.४), गोंदिया ३८.२ (२२.८), नागपूर ३८.६ (२३.५), वर्धा ४० (२६.८), वाशीम - (२०), यवतमाळ ३८.७ (२४.७)
🟠वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड
🟠वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
🟡 वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया
राज्यात पुन्हा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते.तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तात्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण सध्या शेतीपिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आला तर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष बागांची देखील काढणी सुरु आहे. अशातच पाऊस किंवा गारपीट झाल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू, ज्वारी , कांदा पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे
Post a Comment