kusum solar pump yojana maharashtra 2023 online apply |लवकर भरा अर्ज या जिल्ह्याची नोंदणी चालू आहे

 Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रात लोडशेडिंग ची अडचण असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी शेतात ३ फेज लाईट ज्या वेळी असेल त्या वेळी जावे लागायचे. हि लाईट रात्री असेल तरी रात्रीच जावे लागायचे. शेतात रात्रीचे जाणे खूप अवघड असायचे. तसेच रात्रीचे शेतात जंगली प्राणी डुक्कर, साप, लांडगा, कोल्हा इत्यादी असतात. या जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका असायचा. तरी पिकाला पाणी देणे गरजेचे असल्याने शेतकऱ्याला शेतात जावेच लागायचे. या करिता  केंद्र सरकारने कुसुम सोलर पंप हि योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला सोलर पंप खरेदी साठी अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकरी सोलर पंप विकत घेऊ शकतो. ते सोलर पंप शेतात बसवल्यास शेतकरी त्याला ज्या वेळी पाणी द्यायची इच्छा असेल त्या वेळी देऊ शकतो. तरी शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात कुसुम सोलर पंप योजने विषयी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला हि या योजने अंतर्गत सोलर पंप घ्यायचा असेल तर, हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा. म्हणजे तुम्हाला या योजने विषयी सविस्तर माहिती समजेल.

Table of Contents

  •  कुसुम सोलर पंप योजना (  kusum solar pump yojana maharashtra 2023 online apply ) 
  • योजनेचे फायदे
  • योजनेसाठी पात्रता
  • अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे
  • अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे


* कुसुम सोलर पंप योजना ( Kusum Solar Pump Yojna )
हि योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला सोलर पंप खरेदी साठी अनुदान दिले जाते.

* योजनेचे फायदे

- दिवसभर विद्युत पंप ला लाईट ची उपलब्धता.
- कोणत्याही वेळी पिकाला पाणी देता येणार.
- वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही.
- पर्यावरण प्रदूषण होणार नाही.


* योजनेसाठी पात्रता

- शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत ( विहीर, बोर किंवा तलाव ) उपलब्ध असावा.
- शेतकऱ्याकडे अगोदरच विद्युत पंप जोडणी केलेला नसावा.
- शेतकऱ्याकडे ५ एकर पर्यंत जमीन असेल तर 3HP पंप घेता येईल. तसेच ५ एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास 5HP किंवा 7.5HP पंप घेता येईल.
- शेतकऱ्याच्या शेतात लाईट उपलब्ध नसावी.

* अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे

  •  A1 फॉम
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार
  • अर्जदार शेतकऱ्याचा ७-१२ ( विहीर, बोर किंवा तलाव ) नोंद असणे आवश्यक 
  •  
  • अर्जदार शेतकऱ्याचे घोषणापत्र
   * c
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असावे. तसेच ज्या शेतकऱ्याकडे अगोदरचे विद्युत पंप जोडणी नसेल त्या शेतकऱ्यास प्राधान्य.
  •  अति दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
  • ज्या शेतकऱ्यांनी सरकारी योजने अंर्तगत विहीर किंवा तलाव पडलेला असेल अशा शेतकऱ्यांना प्राधान्य.
  • ज्या शेतकऱ्यांना विद्युत खांब जोडणी साठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसेल त्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
ज्या शेतकऱ्याने अटल सोलर पंप योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांना प्राधान्य.कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वरून तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता. या योजनेसाठी सरकार कडून ९० टक्के अनुदान लाभार्थी शेतकऱ्याला दिले जाते. जर तुम्हाला पण सोलर पंप घ्यायचा असेल तर या योजनेचा अर्ज नक्की भरा

अटल सोलर पंप योजनेचा लाभ घेतला असेल व मुख्यमंत्री सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याना लाभ मिळणार नाही व तसे  केल्यास वअर्ज  निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही होते . 


                                                      

Mahitigaar

* अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक लिंक - कुसुम सोलर पंप योजना


* सध्या खालील १९ जिल्ह्याची  नोंदणी चाली आहे . 
  अकोला,  अमरावती ,भंडारा ,  बुलढाणा ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पालघर, पुणे,       रायगड, रत्नागिरी, सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग ,ठाणे, वर्धा 

No comments

Powered by Blogger.