Pm Kisan Yojana KYC: पीएम किसानच्या लाभापासून राहावं लागेल वंचित; केवायसी कशी कराल?
Pm Kisan KYC: केंद्र सरकारने २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm Kisan) योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची अपेक्षा आहे.
१४ वा हप्ता लवकरच केंद्र सरकार जमा करेल, अशी शक्यता आहे. पण त्याआधी शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.केंद्र सरकार पीएम किसान योजनांचा लाभ थेट हस्तांतरण (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.
त्यामुळे शेतकऱ्यांचा बँक खात्याल आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. ई केवायसीसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर केवायसी करता येते.
या वेबसाईट ओपन केल्यावर सुरुवातीला ई केवायसीचा पर्याय दिसतो. तिथे क्लिक करून शेतकरी आधार कार्ड नंबर नोंदवून केवायसी प्रक्रिया करू शकतात.
तसेच बायोमेट्रिक केवायसीसाठी शेतकरी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन नोंदणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ वा हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही.
केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली.
या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांच्या आधी मार्च २०१९ ला या योजनेचा पहिला हप्ता ३ कोटी १६ लाख १४ हजार ८८० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्या आला.
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार २०२३ च्या मार्च वितरित करण्यात आलेला १३ व्यय हप्ता देशातील ८ कोटी ६९ लाख ९८ हजार ४९० शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला आहे.
या योजनेसाठी १०० टक्के निधी केंद्र सरकार पुरवते. वर्षभरात तीन टप्प्यात शेतकऱ्यांना ६ हजार रुपये रक्कम दिले जाते. दर चार महिन्यांने शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जातात.
दरम्यान, विरोधी पक्षाकडून या योजनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. योजनेच्या लाभार्थींची संख्या घटत असल्याचा आरोप केला गेला आहे.
केवायसी कशी कराल?
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर स्थिती तपासण्याची सुविधा देखील दिली आहे. यासोबतच पीएम किसान योजनेच्या कल्याण विभागाशी संपर्कात रहा.
कशी पाहायची ऑनलाईन स्थिती पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in उघडा.
होम पेजवर फार्मर्स कॉर्नरच्या विभागात जा.
येथे लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
आता शेतकऱ्याचे मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका आणि Get Data वर क्लिक करा.
तुमची ऑनलाइन स्थिती तपासण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा ई-मित्र केंद्राशीही संपर्क साधू शकता.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हेल्प डेस्क सुरू केला आहे. आपण इच्छित असल्यास, आपण या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपली समस्या सोडवू शकता. देशातील कोणत्याही क्षेत्रात बसलेले पीएम किसानचे लाभार्थी येथे संपर्क करू शकतात.
PM किसान योजनेसाठी हेल्पलाइन क्रमांक पीएम किसान योजना, दिल्ली हेल्पलाइन क्रमांक: ०११-२३३८२४०१
पीएम किसान योजना ई-मेल आयडी: pmkisan-hqrs@gov.in
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर: ०११—२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसान नवीन हेल्पलाइन क्रमांक: 011-24300606
पीएम किसानची अखिल भारतीय हेल्पलाइन: 0120-6025109

इकडे फिरवा फोन

Post a Comment