केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित |SIP money compounding

केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित

SIP दीर्घ कालावधीसाठी कायम ठेवल्यास, गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगचा प्रचंड फायदा होतो. 

Want to raise a fund of 1 crore in just 10 years How much should be invested per month see the math monthly investment | केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित

केवळ १० वर्षांत १ कोटींचा फंड जमवायचाय? किती करावी लागेल महिन्याला गुंतवणूक, पाहा गणित

म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये, SIP मध्ये सलग 5 व्या महिन्यात 13 हजार कोटी रुपयांचा इनफ्लो होता. एसआयपी दीर्घ कालावधीसाठी कायम ठेवल्यास, गुंतवणूकदारांना कम्पाऊंडिंगचा प्रचंड फायदा होतो. इक्विटी म्युच्युअल फंडांचे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षांत 20 टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे.

एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवता येते. सध्या डेली एसआयपीचीही सुविधा देण्यात येते. म्हणजेच तुम्ही दररोज गुंतवणूक करू शकता. किमान 100 रुपये देऊनही गुंतवणूक सुरू करता येते. एसआयपीमध्ये कम्पाऊंडिंगचा प्रचंड फायदा होतो. जर आपल्याला 10 वर्षांमध्ये 1 कोटींचा निधी जमवायचा असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल हे आपण SIP कॅल्क्युलेशन द्वारे समजून घेऊ.

10 वर्षांत 1 कोटींचा फंड
म्युच्युअल फंड एसआयपीचे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यांचा परतावा गेल्या 10 वर्षांमध्ये 20 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. साधारणपणे, दीर्घ मुदतीत, SIP चा सरासरी वार्षिक परतावा 12 टक्के असू शकतो. अशाप्रकारे, SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दर महिन्याला 45,000 रुपयांची SIP करत असाल, तर तुम्ही 12 टक्के वार्षिक परताव्यानुसार 1,04,55,258 रुपयांचा निधी बनवू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 54,00,000 रुपये असेल आणि अपेक्षित परतावा 50,55,258 रुपये असेल.

दुसरीकडे, जर एखाद्या योजनेचा सरासरी परतावा 20 टक्के असेल, तर तुम्ही 10 वर्षांत 1,72,06,360 रुपयांचा निधी मिळवू शकता. यामध्ये तुमची अंदाजे गुंतवणूक 1,18,06,360 रुपये असेल. म्हणजेच तुम्हाला कम्पाऊंडिंगचा जबरदस्त फायदा मिळेल. तथापि, म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही. हे बाजारावर अवलंबून असतं. म्हणजेच, जर बाजार वाढला किंवा पडला तर तुमच्या फंडाची कामगिरी होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांचा जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या आधारावरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.


Mahitigaar

                                               

                                 SIP Calculator पाहण्यासाठी येथे क्लिक करा


नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

No comments

Powered by Blogger.